पावसाळ्यात एक निरभ्र सूर्योदय, तसे चेहरा क्षणिकच साफ का राहतो ?
चॉकलेट खाणे चांगले नाही तर चवीला छान का लागते?
निराकरण करता-करता परत भांडण का होतं?
आपण हुशार, बाकीचे मठ्ठ असं व्यक्ती का समजतो?
काम पूर्ण झालं की लगेच अजून काम का मिळतं?
झोपेची इतकी आवड आहे तर लाईट तीन वाजेपर्यंत चालू का राहतो?
मित्राशी बोलायला कारण का लागतं?
"आठवण आली कॉल केलं" बोलायला कशाला आपण का-कू करतो?
"मास्क घाला कोरोना होईल!" परत-परत सांगायला का लागतं?
एक कविता लिहून झाली की दुसऱ्या दिवशी परत पेन का उचलावा लागतं?
The above poem is for the NaPoWriMo2021. Day 20 Prompt: A rant poem
No comments:
Post a Comment