मनात आलं की अडकते
गरज पडली की हरवते
शब्द सुचला की बंद पडते
'डूडल' करताना वाहत जाते
शाई विचारा तर पीतच राहते
मग पानावर टेकली की परत थांबते
लाडाने वापरली तर सुकून जाते
झटकली तर चारी दिशांना उडते
शेवटी डाग पुसताना निळे-काळे
वाटे "झरणी नाही, मनाचे चाळे."
The above poem is for the NaPoWriMo2021. Day 15. Prompt: My god-forsaken fountain pen that hasn't been working well recently. Props to Baba for helping out with the poem.
No comments:
Post a Comment