Wednesday 13 April 2022

प्रवासी मित्र










चांडोबा चांदोबा बघतोस काय?

झाडापाठी लपून बसला काय?

सूर्याला भेटून आलास होय,

म्हणूनच तोंड तुझ भाजल काय!


चांदोबा चांदोबा, ती बघ मांजर,

डोळे तिचे दोन काळे चंद्रकोर,

बघून मला देते लांब सूर,

पण जवलास पळे - कसली शूर!


चांदोबा चांदोबा आली ट्रेन!

काय त्या गर्दीला कसला नेम!

चालत्या गाडीत तडफडत शिरावे,

मग कुर्ती फाटल्यास बोगीत रडावे.


चांदोबा चांदोबा आता आलच घर,

आंघोळ नी जेवून करीन पाय वर,

कामाचे प्रवास खूपच थकवे

पण घरी बसून आता नाही राहवे.


The above poem is for the NaPoWriMo2022. Day 13. Am in a good mood so here's a fun Marathi poem.

No comments:

Post a Comment